आम्ही जनतेशी नाही तर नेत्यांशी गद्दारी केली; 'या' नेत्याचं वक्तव्य

आम्ही जनतेशी नाही तर नेत्यांशी गद्दारी केली; ‘या’ नेत्याचं वक्तव्य

| Updated on: Mar 12, 2023 | 12:40 PM

Prahar Bacchu Kadu : "सामान्य माणसाने कानाखाली लावली तरी मी सहन करेन, पण नेत्याची गुलामगिरी मान्य नाही!", असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

अमरावती : प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी गद्दारीवर भाष्य केलंय. आम्ही गद्दारी केली पण जनतेशी नाही तर नेत्याशी, असं बच्चू कडू म्हणाले आहेत. ते अमरावतीत बोलत होते. जे काही सहन करावं लागेल ते करेन पण सामान्य माणसाशी आम्ही कधीही गद्दारी करणार नाही. त्यांना कधीही फसवणार नाही.सामान्य माणसाने कानाखाली लावली तरी मी सहन करेन पण नेत्याची गुलामगिरी मला मान्य नाही, असं बच्चू कडू म्हणाले आहेत. निवडणूक केव्हाही झाली तर आम्ही तयार आहोत. परीक्षेचा अभ्यास ऐनवेळेवर करणारे लोक आम्ही नाहीत. पाच वर्ष आम्ही अभ्यासच करत असतो. काम करत असतो. निवडणूक उद्याही लागली तर आम्ही तयार आहोत, असंही बच्चू कडू म्हणालेत.

Published on: Mar 12, 2023 12:40 PM