अमरावतीनंतर आता नागपूरात बच्चू कडूंवर होणार उपचार

अमरावतीनंतर आता नागपूरात बच्चू कडूंवर होणार उपचार

| Updated on: Jan 11, 2023 | 1:06 PM

भाजपचे आमदार जयकुमार गोरे, राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे, माजी मंत्री रामदास कदम यांचे पुत्र आणि आमदार योगेश कदम यांच्या गाडीला अपघात झाला होता. त्यानंतर आता आमदार बच्चू कडू यांचा अपघात झाला आहे.

अमरावती : राज्यातील नेत्यांच्या अपघाताची मालिका सुरूच असून आता प्रहार संघटनेचे नेते, माजी मंत्री, आमदार बच्चू कडू यांचा अपघात झाला आहे. त्यामुळे या सिलसिला-ए-अपघातला ब्रेक लागणार कधी असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

याच्या आधी भाजपचे आमदार जयकुमार गोरे, राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे, माजी मंत्री रामदास कदम यांचे पुत्र आणि आमदार योगेश कदम यांच्या गाडीला अपघात झाला होता. त्यानंतर आता आमदार बच्चू कडू यांचा अपघात झाला आहे. सध्या त्यांच्यावर अमरावतीत उपचार सुरू आहेत.

आमदार बच्चू कडू यांचा सकाळी अपघात झाल्या. त्यांच्या डोक्याला, पायाला आणि हाताला चांगलाच मार बसला. तर डोल्याला चार टाके पडले आहेत. डोक्याला जास्त मार लागला असल्यामुळे बच्चू कडू यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथिल न्यूरॉन हॉस्पिटलला शिफ्ट केले आहे.

Published on: Jan 11, 2023 01:06 PM