आमदार बच्चू कडू यांच्या अडचणी वाढवणार? कलम 506 अंतर्गत दोषी, बघा काय आहे प्रकरण?
VIDEO | प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू यांना उस्मानाबाद जिल्हा कोर्टाकडून शिक्षा, कलम 506 अंतर्गत दोषी, बघा काय आहे प्रकरण?
धाराशिव : धाराशिवमधून म्हणजेच उस्मानाबाद मधून मोठी बातमी समोर येत आहे. प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू यांना पोलिसांना अपमानास्पद वागणूक दिल्याने कलम 506 अंतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे. याबाबत धाराशिव जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राजेश गुप्ता यांनी आदेश दिले आहेत. तर याप्रकरणात वकील महेंद्र देशमुख यांनी सरकारची बाजू मांडली आहे. यानंतर आता बच्चू कडू यांच्या अडचणी वाढणार की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धाराशिव जिल्हा परिषदेत 2 नोव्हेंबर 2015 मध्ये आंदोलन करण्यात आले. या आंदोलना दरम्यान बच्चू कडू आणि अधिकारी यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता.
Published on: Feb 27, 2023 07:42 PM