प्राजक्त तनपुरे यांचा पाठिंबा कोणाला? अजित पवार यांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण
अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. काही आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा दिला आहे, तर काहींनी आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. आज माजी राज्यमंत्री राष्ट्रवादीच्या आमदार प्राजक्त तनपुरे हे अजित पवार यांनी अजित पवार यांची भेट घेतली.
मुंबई: अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले आहे. काही आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा दिला आहे, तर काहींनी आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीतील अनेक कार्यकर्ते पदाधिकारी हे अजित पवारांची भेट घेत आहेत. आज माजी राज्यमंत्री राष्ट्रवादीच्या आमदार प्राजक्त तनपुरे हे अजित पवार यांनी अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर तनपुरे नेमकं कोणाला पाठिंबा देत आहेत याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. यावर आता प्राजक्त तनपुरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.तर यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आपली भूमिका मांडली आहे. “जी मुंबईत बैठक झाली त्याची मला कोणतीही कल्पना नव्हती. नंतर जी काही नाट्यमय घटना घडली त्यानंतर मी पवार साहेबांसोबत असल्याचे” प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले होते.