प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे करणार आज युतीची घोषणा यासह अधिक बातम्या 4 मिनिट 24 हेडलाईन्समध्ये
निवडणूक आयोगाकडे धनुष्यबाण आणि शिवसेना पक्षाबाबत लिखित युक्तिवाद निवडणूक आयोगाकडे उद्धव ठाकरे गटाकडून सादर करण्यात येणार आहे
मुंबई : लाखो शिवसैनिकांच्या महानायकाला अभिवादन असं ट्विट उद्धव ठाकरे ( uddhav thackarey ) यांनी केलं आहे. उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख पदाची मुदत आज संपत आहे. निवडणूक आयोगाकडे धनुष्यबाण आणि शिवसेना पक्षाबाबत लिखित युक्तिवाद निवडणूक आयोगाकडे उद्धव ठाकरे गटाकडून सादर करण्यात येणार आहे. तसेच, प्रतिनिधी सभा आणि मुख्य नेतेपदाबाबत लेखी म्हणणे पाठवणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची आज दुपारी एक वाजता संयुक्त पत्रकार परिषद होणार असून यावेळी वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, कोणतीही युती झाली तरी भाजप आणि शिंदे गट हे एकत्रच रहाणार असे मंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले आहे.
Latest Videos