प्रकाश आंबेडकर यांचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाले ‘आता मंत्रिमंडळही काँट्रॅक्टवर भरा…’
सातारा जिल्ह्यात दंगल घडवलेली आहे. राज्य सरकार कंत्राटी भरती करत आहे. आयएएस अधिकारीही काँट्रॅक्टवर भारती करणार आहे. आता मंत्रिमंडळही काँट्रॅक्टवर भरा. शासन भांडलवदार झालं आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली
पुणे : 16 सप्टेंबर 2023 | कोविड नसता तर आतापर्यंत भीमा कोरेगाव प्रकरणाची सुनावणी झाली असती. पण, ही सुनावणी एका बाजूनेच सुरू आहे. माझी उलट तपासणी झाली. संभाजी महाराज यांची समाधी त्याची तपासणी झाली. पण, जशी हवी तशी तपासणी होत नाही. योग्य रीतीने कामकाज होत नाही असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी केली. भीमा कोरेगाव प्रकरणाची सुनावणी होत आहे. परंतु, आयोगाच्या हातात काहीही नाही. पुढील सुनावणी १९ ऑक्टोबरला होणार आहे. मात्र, महत्वाच्या व्यक्तींची साक्ष झाल्याशिवाय ही सुनावणी पूर्ण होणार नाही. पूर्वीच्या अनेक गोष्टी परत नव्याने काढल्या जात आहे असे ते म्हणाले. मराठवाड्यातील दुष्काळाकडे सरकार काळजीपूर्वक बघत नाही. कल्पकता असल्याशिवाय इथला दुष्काळ संपणार नाही. पाणी वळवले तर दुष्काळ संपेल अशी येथील परिस्थिती आहे. इंडिया आघाडीवर बहिष्कार घातला. कारण, प्रत्येक पक्षांनी ज्याचा त्याचा निर्णय घेतला आहे. पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात कोण आहेत. त्यांच्या अध्यक्ष कोण आहेत असा सवाल त्यांनी केला. मोदी यांनी विशेष अधिवेशन बोलावले. पण अन्जेंडा सांगितलं नाही. त्यामुळे विरोधकांनीच आपला अजेंडा ठरवला. मी किती शहाणा आहे आणि उरलेले माझ्या शहानपणाशी जोडू शकत नाही हे त्यांनी दाखवून दिले आहे, असा टोला त्यांनी लगावला.