Prakash Ambedkar : एनसीपीतील एनसीपीतले काही नेते संभाजी भिडेंसोबत -प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar : एनसीपीतील एनसीपीतले काही नेते संभाजी भिडेंसोबत -प्रकाश आंबेडकर

| Updated on: May 05, 2022 | 8:00 PM

एनसीपीतले काही नेते संभाजी भिडे यांच्यासोबत दिसत आहेत. गृहखाते राष्ट्रवादीकडे आहे. त्या पार्श्वभूमीवर भिडेंना क्लीनचीट मिळाली. त्यामुळे शरद पवार यांच्या पक्षातले नेते, गृहमंत्री आणि इतर मंत्री त्यांचे ऐकत नाही असे आहे का, असा सवाल त्यांनी केला आहे. एनसीपीचे नेते भिडे यांना का वाचवायचा प्रयत्न करत आहेत.

पुणे : शरद पवार यांनी कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणातली (Koregaon Bhima) सर्व कागदपत्रे आयोगासमोर सादर करावीत. तपास अधिकाऱ्याला नंतर वाचवायला कोणी येणार नाही, त्यामुळे त्याने आत्ताच खरे काय आहे ते सांगावे, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरेगाव भीमा आयोगासमोर आज साक्ष होती. तर या हिंसाचारप्रकरणी संभाजी भिडे यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी क्लीनचीट दिली, त्यानंतर ते बोलत होते. एकूणच संभाजी भिडे यांच्या प्रकरणावरून त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका केली. ते म्हणाले, की राष्ट्रवादीतले अनेक नेते हे संभाजी भिडे यांच्या पाया पडताना दिसतात. जो माणूस संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्या पाया पडतो, तो त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. असे एनसीपीमध्ये एक नाही अनेक आहेत हे सगळ्यांना माहिती आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे. तसेच हे नेते कोण आहेत, हे चौकशीत समोर येईल, असे ते म्हणाले.

Published on: May 05, 2022 08:00 PM