Video | ‘कॉंग्रेसमधील सुपारी बहाद्दूरांना आवरले नाही…तर एक दिवस…,’ काय म्हणाले प्रकाश आंबेडकर
प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापूरातील वंचित बहुजन आघाडीच्या सभेत कॉंग्रेस आणि भाजपा सरकार वर टीका केली. युती व्हावी अशी माझी इच्छा असताना देखील कॉंग्रेस नेते ईडीच्या भीतीने मुद्दामहून अडथळा आणत आहेत. आपल्यावर भाजपाला मदत केल्याची टीका करीत आहेत. तुम्हाला लढायची हिंमत नसेल तर बाजूला व्हा आम्ही मोदींना हरवितो असे आव्हानच प्रकाश आंबेडकर यांनी कॉंग्रेसला केले.
कोल्हापूर | 9 मार्च 2024 : साल 2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला कर्जबाजारी केले आहे. काही दिवसांनी आपली अवस्था देखील पाकिस्तानसारखी होणार आहे. त्यामुळे धर्मांधशक्तींपासून देशाला वाचविण्यासाठी एकत्र येण्याची गरज असताना कॉंग्रेसचे नेते मुद्दामहून आघाडी होऊ नये यासाठी सुपारी घेतल्याप्रमाणे काम करीत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी या सुपारीबाज नेत्यांना पक्षातून काढावं, अन्यथा त्यांची नावे तीन दिवसांत आपण जाहीर करु असेही आंबेडकर यांनी सांगितले. कॉंग्रेसमधील सुपारी बहाद्दूरांना आवरले नाही मोदी सत्तेवर आले तर यांना तुरुंगात जावे लागणार असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. देश कधी तुटलाच नाही, अजूनही एकसंघ आहे आणि कॉंग्रेसचे नेते ‘भारत जोडो’ म्हणून यात्रा काढत आहे. कॉंग्रेसवाले भुरटे चोर आहेत. त्यांनी भुरट्या चोरी केल्याची कबुली दिली तरी लोक त्यांना लोक माफ करतील, परंतू सध्याचे सरकार हे डाकूचे सरकार आहे. यांनी शंभर रुपयातील 24 रुपयाचं कर्ज होते ते या सरकारने हे कर्ज 84 रुपये केले असल्याची टीकाही आंबेडकर यांनी केली. मोदींना पुन्हा सत्तेवर आणले तर तर 100 रुपयाचं कर्ज करुन मोदी झोला घेऊन हिमालयात जाऊन बसतील असाही दावा आंबेडकर यांनी केली.