मी माझा मालक आहे, आमचं अजून….,’ काय म्हणाले प्रकाश आंबेडकर
प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीतून वंचित होणार का ? असा सवाल विचारला जात आहे. तर दुसरीकडे शिवसेना नेते संजय राऊत यांनी येत्या 6 मार्चला वंचित बहुजन आघाडीशी बोलणी होणार असल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर भंडारा येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रकाश आंबडेकर यांनी आपली पुढील दिशा सांगितली आहे.
भंडारा | 4 मार्च 2024 : लोकसभा निवडणूकांच्या तारखा केव्हाही घोषीत होऊ शकतात अशी परिस्थिती आहे. भाजपाने देशातील 195 उमेदवारांची पहीली यादी जाहीर करीत आघाडी घेतली आहे. परंतू कॉंग्रेस आणि इंडिया आघाडीने अजूनही आपली पहीली यादी जाहीर केलेली नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडीत वंचित बहुजन आघाडी सामील होणार की नाही यावरुन सस्पेन्स कायम आहे. आता 6 मार्चला पुन्हा वंचित बहुजन आघाडीशी महाविकास आघाडीची बैठक आहे. यासंदर्भात मिडीयाने वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वे प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी अजूनपर्यंत आमचे काही ठरले नसल्याचे म्हटले आहे. महाविकास आघाडीच्या सभांना जाऊ नका असा आपला व्हिडीओ आम्ही आमच्या कार्यकर्त्यांशी इंटर्नल कम्युनिकेशसाठी तयार केला होता. वंचित बहुजन आघाडीचे वर्ध्याचे उमेदवार जाहीर केले नसून ते पत्र जिल्हाध्यक्षाने मला पाठविल्या संभाव्य उमेदवारांची यादी होती. मिडीयाने पत्राचा मजकून नीट समजून न घेतल्याने किंवा समजला तर आघाडीत बिघाडी झाली या अजेंड्याला मुद्दामहून पसरविल्याचा आरोपही आंबेडकर यांनी केला आहे.