प्रकाश आंबेडकर यांची ‘ती’ केवळ मनघडत कहाणी, नाना पटोले यांनी केला हा मोठा खुलासा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची युती झाली. ते एकत्र आले त्या दिवशी आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या.
गोंदिया : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( uddhav thackarey ) आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ( prakash ambedkar ) यांची युती झाली. ते एकत्र आले त्या दिवशी आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या. पण, त्याची जी युती झाली आहे त्याचा आणि महाविकास आघाडीचा काही संबंध नाही. आमच्याकडे युतीचा कोणताही प्रस्ताव आला नाही. त्यामुळे प्रतिक्रिया देण्याचे काही काम नाही. प्रकाश आंबेडकराना आम्ही प्रस्ताव दिला नाही किंवा त्यांचा प्रस्ताव आमच्याकडे आला नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( nana patole ) यांनी स्पष्ट केले आहे.
गोंदिया येथे एका लग्नसोहळ्याला हजेरी लावण्यासाठी आले असताना ते बोलत होते. प्रकाश आंबेडकर यांची महाविकास आघाडीतील एन्ट्री केवळ मनघडत कहाणी आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल आम्हाला काही बोलायचे नाही. आम्ही काही त्यांना प्रस्ताव दिला नाही, असे ते म्हणाले.