‘नव्या संसद भवनचे पुन्हा करू उद्घाटन’; राज्यातील मोठ्या नेत्याचं वक्तव्य; म्हणाला, ‘राष्ट्रपतींना डावलून’
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या संसद भवनाचं उद्घाटन करण्यात यावं अशी मागमी विरोधकांनी केली होती. त्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं होतं.
जळगाव : 28 मे रोजी देशाच्या नव्या संसद भवनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. त्यावरून विरोधी पक्षाने या संसद भवनाच्या सोहळ्याला विरोध केला. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या संसद भवनाचं उद्घाटन करण्यात यावं अशी मागमी विरोधकांनी केली होती. त्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं होतं. त्यांनी लोकसभा निवडणुकीनंतर भाजपची सत्ता गेली आणि आम्ही सत्तेत आलो तर संसद भवनाचं पुन्हा उद्घाटन करू. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्तेच आम्ही उद्घाटन करू. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाची संसद भवनावरील नेम प्लेटही काढून टाकू, असं म्हटलं होतं. आता पुन्हा एकदा आंबेडकर यांनी भाजपवर निशाना साधलता आहे. तसेच देशातील सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीला तुम्ही डावलू शकत नाही. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकार सत्तेतून गेल्यानंतर, जेव्हा आमचं सरकार येईल. तेव्हा भारतीय संसदेचं आम्ही पुन्हा उद्घाटन करू, अशी प्रतिक्रिया आंबेडकर यांनी पुन्हा दिली आहे. जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे वंचित बहुजन आघाडीकडून हक्क परिषद घेण्यात आली होती. यावेळेस वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. तर राष्ट्रपतींना डावलून संसद भवनाचं उद्घाटन केले आहे. हे आम्हाला मान्य नाही, आम्ही पुन्हा उद्घाटन करू असे यावेळी आंबेडकर यांनी म्हटलं आहे.