'...तर ऑक्टोबरमध्येच लोकसभा निवडणुका लागतील', प्रकाश आंबेडकर यांनी दिला संकेत

‘…तर ऑक्टोबरमध्येच लोकसभा निवडणुका लागतील’, प्रकाश आंबेडकर यांनी दिला संकेत

| Updated on: Aug 02, 2023 | 11:47 AM

आतापर्यंत दुसऱ्यांदा मोदी सरकारकडून नोदाबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे देशातील विरोधकांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा तोफ डागली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

अकोला : भारतीय रिझर्व्ह बँकने 2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली आहे. नागरिकांनी त्यांच्याकडे असलेल्या 2 हजार रुपयांच्या नोटा बँकेत जमा करण्याचं आवाहन रिझर्व्ह बँकेकडून करण्यात आलं आहे.आतापर्यंत दुसऱ्यांदा मोदी सरकारकडून नोदाबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे देशातील विरोधकांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा तोफ डागली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. “विरोधकांना निधी मिळू नये आणि त्याचबरोबर विरोधकांकडे निधी येऊ नये, या दृष्टीने टाकलेला हा खेळ आहे. त्यामुळे येथील राजकीय पक्षाने गाफील राहू नये.ऑक्टोबरमध्ये लोकसभेच्या निवडणुका लागतीलच”, असे संकेत प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

Published on: May 21, 2023 07:22 AM