“मणिपूरमधील घटना पहिली नाही, तर…”, व्हायरल व्हिडीओ प्रकरणी प्रकाश आंबेडकर म्हणाले…
मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू असतानाच दोन महिलांसोबत अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई, 21 जुलै 2023| मणिपूर मध्ये हिंसाचार सुरू असतानाच दोन महिलांसोबत अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “माझ्या अंदाजानुसार मणिपूरमधील ही पहिली घटना नाही. या आधीही महिलांनी तिथे अनेक मोर्चे काढलेले आहेत. शासन भाजपचे असू किंवा कोणाचेही असू, मी आधीही सांगितले, की चीन अतिक्रमण करत आहे. त्यामुळे आपण त्यांना जसे आहे तसे स्वीकारायला हवे आहे.” तसेच “उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी विविध मागण्यांवर यशस्वी चर्चा झाली असून बीडीडी चाळींच्या विषय़ावर अर्धी चर्चा झाली आहे. तो प्रश्नही आपण मार्गी लावू ,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
Published on: Jul 21, 2023 10:25 AM
Latest Videos