औरंगजेबाच्या स्टेटसवरून फडणवीस यांना बड्या नेत्याचं प्रत्युत्तर; तर त्यावर ब्राह्मण महासंघाचा आक्षेप

औरंगजेबाच्या स्टेटसवरून फडणवीस यांना बड्या नेत्याचं प्रत्युत्तर; तर त्यावर ब्राह्मण महासंघाचा आक्षेप

| Updated on: Jun 10, 2023 | 8:54 AM

औरंगजेबाचा फोटो ठेवून औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारा मजकूर शेअर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून होताना दिसत आहे. तर राज्यातले सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करत आहेत.

मुंबई : मुघल बादशाह औरंगजेबाचे पोस्टर आणि सोशल मीडिया स्टेटसवरून राज्यातलं वातावरण तापलं आहे. औरंगजेबाचा फोटो ठेवून औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारा मजकूर शेअर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून होताना दिसत आहे. तर राज्यातले सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करत आहेत. त्याचदरम्यान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अचानक ओरंगजेबाच्या एवढ्या अवलादी कुठून पैदा झाल्या याचा शोध घ्यावा लागेल, असं म्हटलं होतं. फडणवीसांच्या याच वक्तव्यावर प्रकाश आंबेडकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच औरंगजेब या मातीतला आहे. औरंगजेब कुठून पैदा झाला असं विचारत आहेत, दुसरीकडे कुठे पैदा झाला असेल तर ते देवेंद्र फडणवीसांनी सांगावं असं म्हटलं आहे. तर त्यावर आता ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी आक्षेप घेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच औरंगजेब याच मातीतला त्याच समर्थन केल तर काय चुकीचं हे प्रकाश आंबेडकर यांचं वाक्य पूर्ण पणे हिंदू द्रोही आणि औरंगी कृत्याचे समर्थन करणारे असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Published on: Jun 10, 2023 08:54 AM