Video | ‘स्वत: खात नाही, दुसऱ्यांना…,’ प्रकाश आंबेडकर यांची पंतप्रधानांवर टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'ना खाऊंगा ना खाने दूंगा' या घोषणेवरुन त्यांच्यावर टीका केली आहे.
अकोला | 18 फेब्रुवारी 2024 : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की ‘ना खाऊंगा, ना खाणे दुंगा,’ आपल्या काय वाटते याने बायको सोडलेली आहे. पोरं नाहीत, आपल्याला खरं वाटते की एकटाच आहे. एकटाच आहे मग कमाविणार कोणासाठी ? आगे पिछे कोणीच नाही. आणि म्हणून आपल्या विश्वास वाटतो की हा बाबा खरा बोलतोय. या बाबाचं खाणं पण वेगळे आहे. तो खात नाही हे सर्टीफिकीट मी तुम्हाला देतो. तो स्वत: खात नाही, पण तो दुसऱ्यांना खिलवतो. आणि दुसऱ्यांना खिलवून झाले की मग त्याला म्हणतो अर्धे मला दे अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.
Published on: Feb 18, 2024 03:33 PM
Latest Videos