Prakash Ambedkar on Governor | राज्यपालांचं वक्तव्य म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला सर्वात मोठा टोला, काय म्हणाले आंबेडकर?

Prakash Ambedkar on Governor | राज्यपालांचं वक्तव्य म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला सर्वात मोठा टोला, काय म्हणाले आंबेडकर?

| Updated on: Jul 30, 2022 | 5:02 PM

Prakash Ambedkar on Governor | राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्यावरुन राज्यात गदारोळ माजला असताना प्रकाश आंबडेकर यांनी वक्तव्याचं समर्थन केलं आहे.

Prakash Ambedkar on Governor | राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्या वक्तव्यावरुन राज्यात गदारोळ माजला असताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबडेकर (Prakash Ambedkar) यांनी वक्तव्याचं समर्थन केलं आहे. आज राज्यातील व्यापार हा गुजराती आणि राजस्थान लोकांच्या हातात आहे. त्यामुळे राज्यपालाचं वक्तव्य कुठं चुकलं? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. एवढ्यावरच न थांबता राज्यपालांच्या वक्तव्याचा आधार घेऊन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)आणि काँग्रेसला (Congress) झोडून काढले. इतके वर्षे सत्तेत ही पक्ष होती. त्यांच्या हातात सत्ता होती. मराठ्यांचा विकास करण्यासाठी हे पक्ष सत्तेत आले. त्यांनी कधी मराठ्यांच्या हातात अर्थकारण जाऊ दिले नाही. त्यामुळे आता राज्यपालांचं वक्तव्य हे डोळे उघडं करणारे आहे. बुजगावण्यासोबत जायचं की नवीन नेतृत्वासोबत जाचयं हे मराठ्यांनी आता ठरवावे असा सल्ला ही त्यांनी दिला.