Video | 'सत्ताधीश होण्याची हीच वेळ, आंबेडकर सोबत आले...,' काय म्हणाले प्रकाश शेंडगे

Video | ‘सत्ताधीश होण्याची हीच वेळ, आंबेडकर सोबत आले…,’ काय म्हणाले प्रकाश शेंडगे

| Updated on: Mar 09, 2024 | 10:29 PM

ओबीसींचे नेते प्रकाश शेंडगे यांनी अलिकडेच नवा पक्ष स्थापन केला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी सोबत आम्ही घेतलेल्या सभा लाखांची गर्दी झाली आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी सत्तेत येण्यासाठी आमच्या सोबत युती करावी असे आवाहन शेंडगे यांनी केले आहे.

मुंबई | 9 मार्च 2024 : लोकसभा निवडणूकांची घोषणा येत्या चार ते पाच दिवसात होऊ शकते. दुसरीकडे महाविकास आघाडीचे वंचितचे प्रकाश आंबेडकर यांच्याशी सुरु असलेले चर्चेचे गुऱ्हाळ सुरुच आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी सत्ताधीश बनण्याची हीच वेळ असल्याचे ओळखून आमच्या सोबत यावे असे आवाहन ओबीसी बहुजन पार्टीचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे यांनी केला आहे. आरक्षणवादी पक्षांनी एकत्र आले तर ओबीसी आणि बहुजनाचे 60 टक्के मते आणि दलितांची 20 टक्के मते एकत्र आली तर महाराष्ट्रात मोठा बदल होईल. ओबीसी आणि मराठा आरक्षणाचे ताट वेगळे आहे असे मत प्रकाश आंबेडकर यांनी मांडले आहे. आमची युती झाली तर 48 च्या 48 लोकसभेत आमचे उमेदवार निवडून येऊ शकती अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे शेंडगे यांनी म्हटले आहे. त्यातच मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी काहीही झाले तर भाजपाला मतदान करु नका असे आवाहन केले असल्याने आता 12 बलुतेदारांची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे प्रकाश शेंडगे यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांनी मराठ्यांना 10 टक्के आरक्षण देताना त्यांना जादा प्रसिद्धी मिळाल्याने त्यांचा टीआरपी कमी करण्याचाही प्रयत्न सरकार करीत असल्याचे दिसत असल्याचा आरोपही शेंडगे यांनी केला आहे.

Published on: Mar 09, 2024 10:28 PM