Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंबरनाथच्या प्रणव कोतवालचा ज्युनिअर मिस्टर इंडिया स्पर्धेत डंका

अंबरनाथच्या प्रणव कोतवालचा ज्युनिअर मिस्टर इंडिया स्पर्धेत डंका

| Updated on: Mar 08, 2022 | 11:42 AM

अंबरनाथच्या (Ambernath) एका बॉल्डीबिल्डरने राष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवत शहराचा लौकिक वाढवलाय. प्रणव गणेश कोतवाल असं या बॉडीबिल्डरचं (BodyBuilder) नाव असून त्यानं ज्युनिअर मिस्टर इंडिया या स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावलाय.

अंबरनाथच्या (Ambernath) एका बॉल्डीबिल्डरने राष्ट्रीय स्पर्धेत यश मिळवत शहराचा लौकिक वाढवलाय. प्रणव गणेश कोतवाल असं या बॉडीबिल्डरचं (BodyBuilder) नाव असून त्यानं ज्युनिअर मिस्टर इंडिया या स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावलाय. प्रणव कोतवाल (Pranav Kotwal) हा अंबरनाथच्या बारकू पाडा परिसरात वास्तव्याला आहे. अवघ्या १८ वर्षांच्या प्रणवने मागील ३ वर्षांपासून व्यायाम  करायला सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू बॉडीबिल्डिंग हेच त्याचं पॅशन बनलं. अथक परिश्रम आणि सरावाच्या जोरावर प्रणवनं चांगली शरीरयष्टी कमावली. यानंतर राज्यपातळीच्या बॉडी बिल्डिंग स्पर्धेत उतरत त्यानं सुवर्णपदकाची कमाई केली.
Published on: Mar 08, 2022 11:14 AM