“पंतप्रधान मोदी सत्तेत आल्यापासून महिलांच्या विरोधात…”, मणिपूर घटनेवर प्रणिती शिंदे आक्रमक
मणिपूरमधील दोन महिलांची निर्वस्त्र धिंड काढण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेनंतर विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. याच पार्श्वभूमीवर प्रणिती शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई, 21 जुलै 2023 | मणिपूरमधील दोन महिलांची निर्वस्त्र धिंड काढण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. याच पार्श्वभूमीवर प्रणिती शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रणिती शिंदे म्हणाल्या की, “मणिपूरमध्ये ज्या पद्धतीने त्या महिलांवर अत्याचार झाला ते बघून अंगावर शहारे आले आहे. अशा घटना आपल्या देशात घडत असतील तर एक भारतीय म्हणून ही आपल्यासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे. जेव्हापासून मोदी सरकार सत्तेत आल्यापासून महिलांच्या विरोधातील विचारसरणी वाढत चालली आहे. हा विषय फक्त मणिपूर पुरताच मर्यादित नाही. तर हा आपल्या देशाच्या प्रतिमेचा आणि प्रतिष्ठेचा विषय आहे.पंतप्रधान मोदी संसदेत या विषयावर भाष्य करायला तयार नाही. आम्ही विधानसभेत या प्रश्नावर बोलायला थोडा वेळ मागविला तर त्यांनी आम्हाला बोलू दिले नाही.म्हणून आम्ही सभा त्याग केली.”