संभाजी भिडे यांच्यासारख्या माणसांना पुढे करून भाजप समाजातलं संतुलन बिघडवतेय, प्रणिती शिंदे यांचा हल्लाबोल

“संभाजी भिडे यांच्यासारख्या माणसांना पुढे करून भाजप समाजातलं संतुलन बिघडवतेय”, प्रणिती शिंदे यांचा हल्लाबोल

| Updated on: Jul 31, 2023 | 2:45 PM

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्यावर वादग्रस्त विधान केल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे. सोलापुरात संभाजी भिडे यांच्या विरोधात काँग्रेसने आंदोलन केलं आहे. या आंदोलनात काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी भाजप आणि संभाजी भिडे यांच्यावर सडकून टीका केली आहे.

सोलापूर, 31 जुलै 2023 | शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यानंतर संभाजी भिडे चांगलेच वादात सापडले आहेत. संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर काँग्रेसकडून निषेध करण्यात आला आहे. राज्यभरात संभाजी भिडे यांच्या विरोधात काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात येत आहे. संभाजी भिडे यांच्या विरोधात सोलापुरात काँग्रेसने भर पावसात आंदोलन करण्यात आलं. सोलापुरातल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ काँग्रेसने हे आंदोलन केलं आहे. या आंदोलनात काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यांनी भाजप आणि संभाजी भिडे यांच्यावर सडकून टीका केली आहे.

Published on: Jul 31, 2023 02:44 PM