हा उद्धव ठाकरे स्वत: ..., एकेरी उल्लेख करत प्रसाद लाड यांची बोचरी टीका

“हा उद्धव ठाकरे स्वत: …”, एकेरी उल्लेख करत प्रसाद लाड यांची बोचरी टीका

| Updated on: Jul 30, 2023 | 1:30 PM

ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृहात ठाकरे गटाने उत्तर भारतीय कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे.

मुंबई, 30 जुलै, 2023 | ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृहात ठाकरे गटाने उत्तर भारतीय कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. ते म्हणाले की, “अस्तित्व टिकवण्याची उद्धव ठाकरे यांची धडपड सुरु आहे. ठाकरेंना आपला पक्ष सांभाळता आला नाही, ते आज शिंदेंवर टीका करत आहेत. मी माझं कुटुंब एवढीच उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे. भाजपबद्दल बोलण्याची कुवत उद्धव ठाकरेची नाही. उद्धव ठाकरेंच्या बोगस वक्तव्याला भाजप भीक घालत नाही.उद्धव ठाकरे स्वतः नालायक आहे, हा मोदींना काय बोलतो.सत्तेसाठी सोनिया गांधींच्या पाया पडले त्यांनी मोदींना बोलू नये, या राज्यातील महानालायक, वाईट वृत्तीचा , क्रूर वृत्तीचा , जर कोणी वाईट माजी मुख्यमंत्री असतील तर ते उद्धव ठाकरे आहेत.”

Published on: Jul 30, 2023 01:30 PM