आंबेडकराच्या कृत्यावर नवा वाद; प्रसाद लाड म्हणतात, “उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी!”
शनिवारी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अचानक औरंगाबादमध्ये जावून औरंगजेबाच्या समाधीला भेट दिल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. आंबेडकरांच्या या कृतीमुळे ठाकरे गटाची चांगलीच कोंडी झाली आहे.आंबेडकरांच्या या कृतीवर शिवसेना आणि भाजपने जोरदार टीका केली आहे.
मुंबई : शनिवारी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अचानक औरंगाबादमध्ये जावून औरंगजेबाच्या समाधीला भेट दिल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. आंबेडकरांच्या या कृतीमुळे ठाकरे गटाची चांगलीच कोंडी झाली आहे.आंबेडकरांच्या या कृतीवर शिवसेना आणि भाजपने जोरदार टीका केली आहे. ठाकरे गटाने आता याबाबतची आपली भूमिका जाहीर करावी, असं आव्हानच भाजपने उद्धव ठाकरे यांना केलं आहे. भाजप नेते प्रसाद लाड यांनी म्हटलं की, “हिंदुत्वाची पताका आमच्या हातात आहे, असे म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांची भूमिका काय? मला जी माहिती कळतेय संजय राऊत यांचं असं ठरलंय की, शिवसेनेच्या वर्धापनदिनी उद्धवजीच्या माध्यमातून औरंगजेबाचे दर्शन घेणार नाहीत ना, आणि हिंदुत्व बाजूला ठेवून चालणार नाहीत ना हा संशय येतो. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या कृत्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने भूमीका स्पष्ट करावी.”