जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका करू नये - प्रसाद लाड यांचा इशारा

जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका करू नये – प्रसाद लाड यांचा इशारा

| Updated on: Dec 11, 2023 | 11:29 AM

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांच्याकडून वारंवार टीका केली जात आहे. मात्र ते योग्य नसल्याचे सांगत, फडणवीस यांच्यावर सातत्याने टीका करू नका, असा इशारा भाजप नेते प्रसाद लाड यांनी दिला.

सुनील ढगे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नागपूर | 11 डिसेंबर 2023 : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांच्याकडून वारंवार टीका केली जात आहे. मात्र ते योग्य नसल्याचे सांगत, फडणवीस यांच्यावर सातत्याने टीका करू नका, असा इशारा भाजप नेते प्रसाद लाड यांनी दिला. ‘ मी संध्याकाळी सोशल मीडियाच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून माझा एक व्हिडिओ युट्युब वर टाकला. जरांगे पाटलांनी देवेंद्रजी वरती टीका करू नये’ असे मी त्यात स्पष्टपण म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस यांचं राजकारणातलं योगदान आणि त्यांनी मराठा आरक्षणासाठी घेतलेली भूमिका आणि केलेल काम यांचा जरांगे पाटलांनी पहिले अभ्यास केला पाहिजे. सगळे मिळून निर्णय घेतात, देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिलं होतं. ते कोणी टिकवून दिलं नाही, त्यांचा बोलविता धनी कोण होता, दिल्लीमध्ये का गेले नाही हे त्यांना जरांगे पाटील का विचारत नाही , असंही प्रसाद लाड म्हणाले. त्यांना माहीत नसेल तर त्यांनी मला फोन करावा, मी माहिती देईन. देवेंद्रजींनी किती रात्र मराठा आरक्षणासाठी अधिवक्तांसोबत चर्चा केली, हे मी सांगेन.

Published on: Dec 11, 2023 11:29 AM