Video : महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात महाविकास आघाडीची सभा- प्रशांत जगताप

Video : महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात महाविकास आघाडीची सभा- प्रशांत जगताप

| Updated on: Apr 28, 2022 | 2:52 PM

महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) सभा होणार आहे. महाविकास आघाडी आणि डाव्या तसेच पुरोगामी पक्षांच्या वतीने ही सभा पुण्यात होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पुणे अध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी दिली आहे. पुण्यातील अलका टॉकीज चौकात 30 एप्रिलला होणाऱ्या सभेला सद्भावना निर्धार सभा संबोधण्यात आले आहे. इंधन दर (Fuel), महागाई, राज्यात वाढणाऱ्या […]

महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) सभा होणार आहे. महाविकास आघाडी आणि डाव्या तसेच पुरोगामी पक्षांच्या वतीने ही सभा पुण्यात होणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पुणे अध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी दिली आहे. पुण्यातील अलका टॉकीज चौकात 30 एप्रिलला होणाऱ्या सभेला सद्भावना निर्धार सभा संबोधण्यात आले आहे. इंधन दर (Fuel), महागाई, राज्यात वाढणाऱ्या धर्मांध सत्तेच्या विरोधात ही सभा होणार आहे. पक्षाचे महत्त्वाचे नेते या सभेला उपस्थित राहणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. भोंग्यावरून राजकीय वातावरण तापले आहे तर दुसरीकडे इंधन दरवाढ हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची ही महत्त्वाची सभा असणार आहे, असे जगताप म्हणाले.