आम्ही व्हीप बजावणार, पालन करावंच लागेल, अन्यथा… ; शिंदेगटाचं ठाकरे गटाला थेट आव्हान
शिंदेगटाचे नेते प्रताप सरनाईक यांनी ठाकरेगटाला थेट आव्हान दिलं आहे. ते नेमकं काय म्हणालेत..
मुंबई : शिंदेगटाचे नेते प्रताप सरनाईक यांनी ठाकरेगटाला थेट आव्हान दिलं आहे. “शिवसेना पक्षाचे प्रवक्ते भरत गोगावले यांनी बैठक बोलावली होती. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. कायदेशीर प्रक्रिया करून उर्वरित निर्णय घेऊ. अधिवेशन काळात आम्ही व्हीप बजावणार आहोत. तो व्हीप सर्व आमदारांना लागू असेल. शिवसेनेच्या 56 आमदारांसाठी हा व्हीप बंधनकारक असेल. प्रतोतांच्या आदेशांचं पालन करावं लागेल. पालन न झाल्यास कारवाई होईल, असं प्रताप सरनाईक म्हणाले. शिवसेनेच्या पार्टी फंडमध्ये आम्हाला रस नाही. तो आमच्यासाठी महत्वाचा नाही.पक्षाचं नाव आणि चिन्ह आमच्यासाठी महत्वाचं आहे, असंही सरनाईक म्हणालेत.
Published on: Feb 20, 2023 02:16 PM
Latest Videos

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...

'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य

प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले

'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
