Video : आदित्य ठाकरेंचा आदेश, पुर्वेश सरनाईक यांची युवासेनेतून हकालपट्टी

Video : आदित्य ठाकरेंचा आदेश, पुर्वेश सरनाईक यांची युवासेनेतून हकालपट्टी

| Updated on: Jul 21, 2022 | 2:36 PM

प्रताप सरनाईक यांचे पुत्र पुर्वेश सरनाईक (Purvesh Sarnaik) यांची युवासेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) आदेशाने ही कारवाई झालीय. एक-एक करत आमदारांसह खासदारांनीही शिंदे गटाला आपला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे शिवसेनेत उभी पूट पडली. प्रताप सरनाईक यांनी आग्रहाने शिंदे गटाची बाजू लावून धरली त्यानंतर आता शिवसेनेकडून त्यांच्या मुलावर कारवाई करण्यात आली आहे. […]

प्रताप सरनाईक यांचे पुत्र पुर्वेश सरनाईक (Purvesh Sarnaik) यांची युवासेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) आदेशाने ही कारवाई झालीय. एक-एक करत आमदारांसह खासदारांनीही शिंदे गटाला आपला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे शिवसेनेत उभी पूट पडली. प्रताप सरनाईक यांनी आग्रहाने शिंदे गटाची बाजू लावून धरली त्यानंतर आता शिवसेनेकडून त्यांच्या मुलावर कारवाई करण्यात आली आहे. प्रताप सरनाईक यांचे पुत्र पुर्वेश सरनाईक यांची युवासेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पण सरनाईकांच्या बंडामुळे आता पुर्वेश यांच्यावरही कारवाई झाल्याचं दिसतंय. त्यांच्यासोबतच सहसचिव किरण साळी यांची युवासेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. आता त्यांच्या जागी नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.

Published on: Jul 21, 2022 02:35 PM