दहीहंडी सणाला राष्ट्रीय सण म्हणून घोषित करून शासकीय सुट्टी जाहीर करण्याची प्रताप सरनाईक यांची मागणी

दहीहंडी सणाला राष्ट्रीय सण म्हणून घोषित करून शासकीय सुट्टी जाहीर करण्याची प्रताप सरनाईक यांची मागणी

| Updated on: Jul 28, 2022 | 11:47 PM

दहीहंडी सणाला राष्ट्रीय सण म्हणून घोषित करून शासकीय सुट्टी जाहीर करण्याची मागणी शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे.  यंदा १९ ऑगस्ट रोजी दहीहंडी साजरी होणार आहे. या दिवशी शासकीय सुट्टी देण्यात यावी यासाठी सरनाईक यांनी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना  पत्र लिहिले.

मुंबई :   गेल्या दोन वर्षापासून कोविडच्या (Covid) काळात निर्बंधामुळे सण उत्सव साजरे करण्यावर निर्बंध लादण्यात आले होते, मात्र यावर्षीचे पुढचे सण निर्बंधमुक्त असणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाहीर केले आहे. यावेळी त्यांनी गणेशोत्सव (Ganesh Chathurthi), दहीहंडी (Dahihandi) आणि मोहरम (Moharam) मोठ्या उत्साहात साजरे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

दहीहंडी सणाला राष्ट्रीय सण म्हणून घोषित करून शासकीय सुट्टी जाहीर करण्याची मागणी शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे.  यंदा १९ ऑगस्ट रोजी दहीहंडी साजरी होणार आहे. या दिवशी शासकीय सुट्टी देण्यात यावी यासाठी सरनाईक यांनी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना  पत्र लिहिले.

राज्यातील सण निर्बंधमुक्त करण्यात येत असून राज्यात गणेशात्सव, दहीहंडी आणि मोहरम हे सण निर्बंधमुक्त असणार आहेत. कोविडच्या काळात सण समारंभ साजरे करता आले नसल्याने यावेळी शिंदे-फडणवीस सरकारने हे कोरोना काळातील नियम हटवून पुढील सण निर्बंधमुक्त होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी गणेश चतुर्थीसाठी एसटी प्रशासनाला जादा बस सोडण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले आहेत.

Published on: Jul 28, 2022 11:47 PM