Pratap Sarnaik | विरोधकांच्या घोषणाबाजीवर प्रताप सरनाईकांची परखड प्रतिक्रिया- tv9

Pratap Sarnaik | विरोधकांच्या घोषणाबाजीवर प्रताप सरनाईकांची परखड प्रतिक्रिया- tv9

| Updated on: Aug 18, 2022 | 1:55 PM

विरोधकाच्या टीकेला उत्तर न देता राज्यातले प्रश्न कसे सोडवले जातील याकडे सत्ताधारी पक्षाने लक्ष द्यायला हवं. तर निश्चितपणे आमचं सरकार त्याकडे लक्ष देईल, हे प्रश्न सोडवतील असं आपल्याला वाटतं असे सरनाईक म्हणाले.

गेल्या दोन दिवसांपासून पावसाळी अधिवेशनात विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचं काम सुरू आहे. तसेच विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसत विरोधकांकडून घोषणा दिल्या जात आहेत. त्यावर प्रताप सरनाईक यांनी आपली परखड प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, राज्यात अनेक प्रश्न आहेत. अनेक समस्या आहेत, त्यात शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. रस्त्यांचा प्रश्न आहे. खड्ड्यांमुळे अनेकांचा बळी जात आहे. अतिवृष्टीमुळे शेतीचा प्रश्न उभा आहे. अशा वेळी विरोधकाच्या टीकेला उत्तर न देता राज्यातले प्रश्न कसे सोडवले जातील याकडे सत्ताधारी पक्षाने लक्ष द्यायला हवं. तर निश्चितपणे आमचं सरकार त्याकडे लक्ष देईल, हे प्रश्न सोडवतील असं आपल्याला वाटतं असे सरनाईक म्हणाले. तसेच आदित्य ठाकरे यांच्यावर बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले, आम्ही गद्दार नाही आम्ही खुद्दार आहोत.