उद्धव ठाकरे अन् अजित पवार ओबीसींविरोधी मंडळी, शिवसेनेच्या खासदाराची टीका

“उद्धव ठाकरे अन् अजित पवार ओबीसींविरोधी मंडळी”, शिवसेनेच्या खासदाराची टीका

| Updated on: Jun 22, 2023 | 12:18 PM

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाबाबत सुरू असलेल्या याचिकेवर अद्याप निर्णय झालेला नाही त्यामुळे रखडल्याचं बोललं जात आहे. अशातच शिंदे-भाजप सरकारमध्ये निवडणुकीला सामोरे जाण्याची हिंमत नाही, असा आरोप वारंवार विरोधकांकडून होत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी विरोधकांवर टीका केली आहे.

बुलढाणा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याआधी कोरोनामुळे, सत्ताबदलामुळे रखडल्याचं दिसत आहे.सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाबाबत सुरू असलेल्या याचिकेवर अद्याप निर्णय झालेला नाही त्यामुळे देखील निवडणुका रखडल्याचं बोललं जात आहे. अशातच शिंदे-भाजप सरकारमध्ये निवडणुकीला सामोरे जाण्याची हिंमत नाही, असा आरोप वारंवार विरोधकांकडून होत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी विरोधकांवर टीका केली आहे. “उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांनी त्यांनी पाहिले जाहीर करावं की आम्ही ओबीसी विरोधात आहोत.ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे म्हणून कोर्टात केस चालू आहे. त्यामुळे निवडणुका थांबल्या आहेत .आता निवडणुका झाल्या तर ओबीसी वर अन्याय होईल. ही सगळी मंडळी ओबीसी विरोधी मंडळी आहे. ओबीसींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी वारंवार निवडणुका घेण्याची मागणी ही मंडळी करतात,” अशी टीका प्रतापराव जाधव यांनी केली.

Published on: Jun 22, 2023 12:18 PM