Video : भाजपच्या शिष्टमंडळाने घेतली पोलीस आयुक्तांची भेट, प्रवीण दरेकर म्हणाले...

Video : भाजपच्या शिष्टमंडळाने घेतली पोलीस आयुक्तांची भेट, प्रवीण दरेकर म्हणाले…

| Updated on: Apr 23, 2022 | 3:13 PM

भाजप नेते मोहित कंबोज (mohit kamboj) यांच्या गाडीवर हल्ला झाल्याने भाजपमध्ये संतापाचे वातावरण आहे. भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (pravin darekar) यांनी पत्रकार परिषद घेऊन या घटनेचा निषेध नोंदवला. भाजपच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेतली.  कंबोज हल्ला आणि नवनीत राणाप्रकरणावरूनही त्यांनी आघाडी सरकारला इशारा दिला. आमच्या शेपटावर पाय ठेवून आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केला […]

भाजप नेते मोहित कंबोज (mohit kamboj) यांच्या गाडीवर हल्ला झाल्याने भाजपमध्ये संतापाचे वातावरण आहे. भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (pravin darekar) यांनी पत्रकार परिषद घेऊन या घटनेचा निषेध नोंदवला. भाजपच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेतली.  कंबोज हल्ला आणि नवनीत राणाप्रकरणावरूनही त्यांनी आघाडी सरकारला इशारा दिला. आमच्या शेपटावर पाय ठेवून आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केला तर भाजप स्वस्थ बसणार नाही. उद्या या अॅक्शनला रिअॅक्शन झालं. तर भाजपही (bjp) टीट फॉर टॅट करू शकते. पण आम्ही कायद्याला मानणारे लोक आहोत. लोकशाही मानणारे आहोत. त्यामुळे लोकशाही मार्गाने जे काही करायचं ते करू, असं प्रवीण दरेकर म्हणाले.

Published on: Apr 23, 2022 03:09 PM