Vinod Tawde | प्रवीण दरेकर आगामी काळात मंत्री होतील- विनाद तावडे यांच वक्तव्य- tv9

Vinod Tawde | प्रवीण दरेकर आगामी काळात मंत्री होतील- विनाद तावडे यांच वक्तव्य- tv9

| Updated on: Aug 16, 2022 | 1:57 PM

यावेळी विनाद तावडे यांनी प्रवीण दरेकर यांच्याबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे भाजपसह अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत

मुंबई : भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाने राज्याने सत्ता काबीज केली आहे. त्यानंतर अनेक दिवसानंतर राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. त्यात भाजपच्या काही चेहऱ्यांना मंत्रिपद मिळालं नाही. तर काहींचं पुनर्वसन करण्यात आलं. मात्र यावेळी विनाद तावडे यांनी प्रवीण दरेकर यांच्याबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे भाजपसह अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. कांदिवली पूर्व येथील अटलबिहारी वाजपेयी उत्कृष्टता केंद्र संकुल भूखंडावर भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळा बसविण्यात आला. त्याप्रसंगी तावडे यांनी हे वक्तव्य केलं. ते म्हणाले मंत्रिमंडळात स्थान न मिळालेले प्रवीण दरेकर आगामी काळात मंत्री होतील

Published on: Aug 16, 2022 01:57 PM