‘मातोश्री एकेकाळी सेंटर, आता ठाकरे सिल्व्हर ओकवर फेऱ्या मारतात’, भाजप नेत्याचा हल्लाबोल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पुन्हा मातोश्रीवर बैठक पार पडली. या भेटीनंतर भाजप आणि शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जात आहे.
सातारा : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पुन्हा मातोश्रीवर बैठक पार पडली. या भेटीनंतर भाजप आणि शिवसेनेकडून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जात आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी मातोश्री हे एकेकाळी देशातल्या नेत्यांचं सेंटर होतं, असं विधान केलं आहे. “मातोश्री हे एकेकाळी देशातल्या नेत्यांचं सेंटर होतं, आता ठाकरे सिल्व्हर ओकवर फेऱ्या मारतात.देशातले नेते बाळासाहेब यांना भेटायला मातोश्रीवर यायचे”, उद्धव ठाकरे यांनी गरिमा घालवली, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
Published on: May 26, 2023 10:58 AM
Latest Videos