Praveen Darker | दिल्लीला मुजरा करत काँग्रेस काम करते, प्रविण दरेकरांची टीका
Praveen Darker | मंत्रिमंडळ विस्तारावरुन शिंदे-फडणवीस दिल्ली वाऱ्या करत असल्याच्या टिकेला उत्तर देताना दिल्लीला मुजरा करत काँग्रेस काम करते अशी टीका प्रविण दरेकरांनी केली आहे.
Praveen Darker | मंत्रिमंडळ विस्तारावरुन शिंदे-फडणवीस दिल्ली वाऱ्या करत असल्याच्या टिकेला उत्तर देताना दिल्लीला मुजरा करत काँग्रेस काम करते अशी टीका भाजप नेते प्रविण दरेकरांनी (Praveen Darekar) केली आहे. पण दिल्लीच्या गोष्टी करणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर त्यांनी टीका केली. दिल्लीला मुजरा करतच काँग्रेस (Congress) काम करते असे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी (NCP)राष्ट्रीय पक्ष आहे, किती राज्यात त्यांची सत्ता आहे असा प्रश्न करत, त्यांच्याही दिल्लीत बैठका होत असल्याचा टोमणा त्यांनी हाणला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात काहीच हाती लागत नसल्याने विरोधक निष्फळ काही ही प्रकरणे उकरून काढत असल्याची टीका त्यांनी केली. तसेच मंत्रीमंडळ विस्तारही लवकरच होईल असे त्यांनी सांगितले. विरोधक निवडणूक जिंकण्यासाठी अशा प्रकारच्या अफवा पसरवतात. भाजप नेहमीच निवडणुकीसाठी सज्ज असून राऊंड द क्लॉक प्रमाणए पक्षाची त्यासाठी तयारी असल्याचे ते म्हणाले.