रेमडेसिव्हीर इंजेक्शनवरुन राजकारण, मंत्र्यांमध्ये एकवाक्यता नसल्याचा दरेकरांचा आरोप
रेमडेसिव्हीर इंजेक्शनवरुन राजकारण, मंत्र्यांमध्ये एकवाक्यता नसल्याचा दरेकरांचा आरोप
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रोज हजारो रुग्ण नव्याने आढळत आहे. सध्या औषधांचासुद्धा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवतो आहे. या पार्श्वभूमीवर रेमडेसिव्हीर इंजेक्श नच्या तुटवड्यावरुन राज्यात आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांंनी केंद्र सरकार राज्याला रेमडेसिव्हीरचा पुरवठा परेशा प्रमाणात करावा, अशी विनंती केली आहे. तर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राज्य सरकारमधील मंत्र्यांमध्येच एकवाक्यता नसल्याचा आरोप केलाय.
Latest Videos