“उद्धवजी जरा बचके रहना”, सुषमा अंधारेंच्या फाईल प्रकरणावर भाजप नेत्याचा सल्ला
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची फाईल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला दिल्याचं सांगितलं आहे. तसेच येत्या काळात शिंदे फडणवीसांचा घटस्फोट होणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. यावर आता भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची फाईल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला दिल्याचं सांगितलं आहे. तसेच येत्या काळात शिंदे फडणवीसांचा घटस्फोट होणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. यावर आता भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “मला वाटतं सुषमा अंधारे यांचा भाजपच्या नेत्यांशी घनिष्ठ संबंध दिसतोय. जवळचा संपर्क दिसतोय, कारण जर त्या म्हणतात तसं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची त्यांना ही फाईल दिली असेल तर, मला वाटतं उद्धव ठाकरेंनी आता सावध राहिलं पाहिजे. जर सुषमा अंधारेंचा आमच्या नेत्यांशी संबंध असेल, आमच्या नेत्यांच्या माहितीच्या आधारे त्या वागत असतील, तर उद्धव ठाकरेंसाठी धोका आहे. उद्धवजी जरा बचके रहना. सुषमा अंधारे कधीही त्या ठिकाणी धोका देऊ शकतात.” “तसेच खासदार संजय राऊत यांनीही अनेकदा पक्षप्रवेशासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडे याचना केल्या आहेत आणि या गोष्टी भविष्यकाळात समोर येतील,” असंही त्यांनी यावेळी सांगितले.