प्रकाश आंबेडकर औरंग्याच्या कबरीवर झुकले; ठाकरे सहमत आहेत का? भाजप नेत्याचा सवाल
शनिवारी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अचानक औरंगाबादमध्ये जावून औरंगजेबाच्या समाधीला भेट दिली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. औरंगजेबावरुन राज्याच्या राजकारणातील वातावरण तापलेलं असताना आंबेडकरांनी औरंगजेबाच्या समाधीजवळ नतमस्तक झाल्याने टीकेचे सूर उमटू लागले.
मुंबई : शनिवारी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अचानक औरंगाबादमध्ये जावून औरंगजेबाच्या समाधीला भेट दिली. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. औरंगजेबावरुन राज्याच्या राजकारणातील वातावरण तापलेलं असताना आंबेडकरांनी औरंगजेबाच्या समाधीजवळ नतमस्तक झाल्याने टीकेचे सूर उमटू लागले.आंबेडकरांच्या या कृतीवर शिवसेना आणि भाजपने जोरदार टीका केली आहे. तर आंबेडकरांच्या या कृतीमुळे उद्धव ठाकरे गटाची चांगलीच कोंडी झाली आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, “मला वाटतं अशा प्रकारच्या कृती या दुर्दैवी आहेत. आज छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचं खुलेआम अपमान करण्याचं काम करण्यात येत आहे.यामध्ये उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करण्याची गरज आहे. त्यांचा वर्धापन दिन 19 जूनला होत आहे. वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा म्हणून सलामी दिली आहे का? हे औरंगजेबाचा कबरीला मुजरा करून दिसून येते आहे.”