“मुख्यमंत्र्यांनी चौकशी लावल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या बुडाखाली आग लागली”, भाजप नेत्याचा घणाघात
जिल्हा परिषदेतील सभागृहात मोदी @9 वर्षपूर्ती निमित्त भाजपची जाहीर सभा पार पडली. या सभेस राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,विधानपरिषद गट नेते प्रवीण दरेकर, शिवेंद्रराजे भोसले,जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर टीका केली.
सातारा: जिल्हा परिषदेतील सभागृहात मोदी @9 वर्षपूर्ती निमित्त भाजपची जाहीर सभा पार पडली. या सभेस राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील,विधानपरिषद गट नेते प्रवीण दरेकर, शिवेंद्रराजे भोसले,जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर टीका केली.”उद्धव ठाकरे, संजय राऊत हे बेताल वक्तव्य करायला लागलेत.ते कधीही विकासाच्या बाबत तोंड उघडत नाहीत.प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहण्याचा प्रकार केला.ओवेसीच्या सभेत औरंगजेबाचा घोषणा देण्यात आल्यात.हे धाडस केलं जातंय. लक्षात ठेवा हे भाजप शिवसेनेचे सरकार आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतलं जाईल औरंगजेबाचे कबर खोदण्याचे काम आमचे लोक करत आहेत. उद्धव ठाकरे 1 जुलैला महानगरपालिकेवर मोर्चा घेऊन जात आहेत. याआधी 25 वर्ष महानगरपालिकेचे नेतृत्व आपण केलं. अडीच वर्षे सत्ता असताना देखील आपण मुंबईसाठी काही केलं नाही. मागील दहा महिन्यात कोणत्याही विकास कामासाठी उद्धव ठाकरेंनी मोर्चा काढला नाही. मात्र कॅगने जीएसआयटी लावली आहे. त्याची मुख्यमंत्र्यांनी चौकशी लावल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या बुडाखाली आग लागलीय, म्हणून एक जुलैला महापालिकेवर मोर्चाचं आयोजन करण्यात आल्याचं,” प्रवीण दरेकर म्हणाले.