“कोव्हिडमध्ये उत्तम सीएम म्हणजे उत्तम चोर माणूस”, भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल
"देवेंद्रजी परिवार तुम्हालाही आहे. तुमच्याही परिवाराचे व्हॉट्सअप बाहेर आले आहेत. आम्ही त्यावर अजून बोललो नाही. आम्ही त्यावर बोललो तर तुम्हाला शवासन करावं लागेल. तुम्हाला कोणतीही आसनं झेपणार नाही. फक्त झोपावं लागेल," असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे.
पुणे : “देवेंद्रजी परिवार तुम्हालाही आहे. तुमच्याही परिवाराचे व्हॉट्सअप बाहेर आले आहेत. आम्ही त्यावर अजून बोललो नाही. आम्ही त्यावर बोललो तर तुम्हाला शवासन करावं लागेल. तुम्हाला कोणतीही आसनं झेपणार नाही. फक्त झोपावं लागेल,” असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी टीका केली आहे. “उद्धव ठाकरे हताश झालेले दिसत आहेत, त्याच्यामुळे त्यांचा आक्रस्ताळेपणा दिसतोय. दुसऱ्यांच्या घरात घुसण्याची भाषा करणारे उद्धव ठाकरे यांनी आपल्यात त्राण किती राहिला ते आधी पाहावं. तुमच्या घरात आधी किती माणसं आहेत ते पाहावं. त्यामुळे अशा प्रकारच्या वल्गना करू नये. फडणवीस याच महत्व महाराष्ट्र पाहतोय,फडणवीस यांच्या सभा लाखोंच्या संख्येने होत आहे,उद्धव ठाकरे यांचं भाषण हतबल झालेलं दिसलं,म्हणून मोदी फडणवीस यांच्यावर बोलत आहेत. कोव्हिडमध्ये उत्तम सीएम म्हणजे उत्तम चोर माणूस असं कोणी म्हटलं तर वावग ठरणार नाही, उद्धव यांनी आपली ताकद मागे वळून पाहवी, “असे प्रवीण दरेकर म्हणाला.