पुण्याच्या वेल्हा तालुक्याला मान्सून पूर्व पावसाने झोडपले; रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप
अनेकांच्या नजरा या आता आभाळाकडे लागलेल्या आहे. दरम्यान अनेक ठिकाणी पाण्यासाठी वणवण करावे लागत असल्याचेही समोर येत आहे. याचदरम्यान पुण्यातील वेल्हा तालुक्याला मात्र मान्सून पूर्व पावसाने जोरदार झोपडपून काढलं आहे.
वेल्हा (पुणे) : राज्यात अनेक ठिकाणी मान्सून पुर्व पावसाची वाट पाहली जात आहे. अनेकांच्या नजरा या आता आभाळाकडे लागलेल्या आहे. दरम्यान अनेक ठिकाणी पाण्यासाठी वणवण करावे लागत असल्याचेही समोर येत आहे. याचदरम्यान पुण्यातील वेल्हा तालुक्याला मात्र मान्सून पूर्व पावसाने जोरदार झोपडपून काढलं आहे. त्यामुळे येथील पासली बालवड गावाच्या रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. कमी वेळात जास्त पाऊस झाल्यानं या भागातील रस्त्यांना ओढ्याचे स्वरूप आले होते. हा डोंगराळ भाग आहे. या मार्गावरच्या पुलावरील मोऱ्या लहान आहेत. त्यामुळं जास्त पाऊस झाल्यावर पाणी पुलाच्या वरून जाते. त्यामुळे येथे अनेकांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. यामुळे याची उंची वाढविण्यात यावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केलीय.
Published on: Jun 10, 2023 10:10 AM
Latest Videos