Nashik | गणपती बाप्पाच्या विसर्जनाची तयारी, विहिरीत नको, कृत्रिम तलावात करा विसर्जन, प्रशासनाचे आवाहन
Nashik | नाशिकमध्ये गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे.
Nashik | नाशिकमध्ये गणपती बाप्पाच्या (Ganpati Bappa)विसर्जनासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. विहिरी, तलावात, नदींमध्ये गणपतीचे विसर्जन न करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. भाविक भक्तांना लाडक्या बाप्पाला निरोप देता यावा यासाठी शहरात जागोजागी कृत्रिम विसर्जन तलाव (Artificial lake) तयार करण्यात आले आहे. याठिकाणी बाप्पाला भक्ती भावाने निरोप देता येईल. तसेच विहिर, तलाव अथवा अन्य नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत प्रदुषित होणार नाही, याची दक्षता घेण्यात येणार आहे. त्यासाठीच्या उपाय योजना अगोदरच करुन ठेवण्यात आल्या आहेत. नाशिक शहरात जवळपास एक हजारांच्यावर गणेश मंडळं आहेत. तर घरगुती गणेशांची संख्या ही खूप मोठी आहे. नदी, तलाव अथवा नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत जपावे असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी पालिकेने कृत्रिम तलावाची सोय केली आहे.