विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची रणनिती तयार; मंत्र्यांना दिल्या 'या' महत्त्वाच्या सूचना

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची रणनिती तयार; मंत्र्यांना दिल्या ‘या’ महत्त्वाच्या सूचना

| Updated on: Sep 25, 2022 | 9:07 AM

भाजपकडून आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. लवकरच विधानसभा निवडणुकीचा रोडमॅपही तयार करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

सुमित सरनाईक, प्रतिनिधी, Tv9 मराठी, मुंबई : भाजपकडून आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. लवकरच विधानसभा निवडणुकीचा रोडमॅपही तयार करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर भाजप पक्षश्रेष्ठींकडून राज्यातील भाजपच्या मंत्र्यांना काही महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यामध्ये राज्यातील मंत्र्यांना विधानसभा मतदारसंघ पिंजून काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार आता भाजपाचे मंत्री राज्यातील 78 मतदारसंघांमध्ये फिरणार आहेत. दुसरीकडे भाजपकडून लोकसभा निवडणुकीच्या तयारीला देखील सुरुवात करण्यात आल्याचं पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा बारामती दौरा आयोजित करण्यात आला. आता विधानसभा निवडणुकीसाठी मंत्र्यांना राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघ पिजून काढण्याचा आदेश देण्यात आला आहे.

 

 

Published on: Sep 25, 2022 09:07 AM