अध्यक्ष नार्वेकर यांची दिल्लीत धाव, पडद्यामागे काय हालचाली होताहेत?
सुप्रीम कोर्टात अपात्रतेसंदर्भात 3 ऑक्टोबरला सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी खासदार संजय राऊत यांनी 16 आमदारांची राजकीय तिरडी बांधलेली आहे. तुमची लाकडं तर तुम्हीच स्मशानात नेलेत अशी टीका केलीय. तर नार्वेकरांकडून विलंब म्हणून महाराष्ट्रात गद्दारांचं सरकार आलय असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावलाय.
मुंबई : 20 सप्टेंबर 2023 | 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 14 सप्टेंबरला पहिली सुनावणी घेतली. शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या वकिलांनी त्यावेळी आपआपली बाजू मांडली. मात्र, ठाकरे गटाच्या याचिकांच्या प्रतीच आम्हाला मिळाल्या नाहीत, असे शिंदे गटाच्या वकिलांनी सांगितलं. त्यामुळे कागदपत्रांची देवाणघेवाण करण्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी 2 आठवड्यांनंतर सुनावणी ठेवली. मात्र, यावरूनच ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. अध्यक्ष यांच्या कार्यवाहीवरुन सुप्रीम कोर्टानं नाराजी व्यक्त केली. त्यामुळे अपात्रतेसंदर्भाच्या कारवाईला वेग आला आहे. आमदार अपात्रता याचिकांवर बाजू मांडण्यासाठी विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना नोटीस पाठवणार आहेत. विशेष म्हणजे स्वत: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर स्वतः दिल्ली गेले आहेत. वरिष्ठ कायदेत्ज्ञ यांच्याशी ते चर्चा करणार अशी माहिती मिळतेय. पण, आपला हा पूर्वनियोजित दौरा आहे. दिल्लीत काही बैठका आहेत असे नार्वेकर सांगताहेत. पण, खरं काय आहे?