Presindent Election : आज राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान, निकाल 21 जुलैला

Presindent Election : आज राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान, निकाल 21 जुलैला

| Updated on: Jul 18, 2022 | 10:18 AM

आज जरी ही मतदान प्रक्रिया पार पडत असली तरी निकालासाठी काही दिवस वाट पाहवी लागणार आहे. 21 जुलैला राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन देशाला नवे राष्ट्रपती मिळणार आहे.

मुंबई : आज देशात राष्ट्रपतीपदासाठी मतदान पार पडतंय. लवकरच देशाला नवे राष्ट्रपती मिळणार (President Election 2022) आहेत. त्यासाठीची मतदान प्रक्रिया (Voting Time) आज पार पडत आहे. देशभरातील आमदार आणि खासदार या निवडणुकीत मतदान करत असतात. शिवसेनेने आधीच या  निवडणुकीत आपला पाठिंबा द्रौपदी मुर्मू यांना जाहीर केला आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार हे यशवंत सिन्हा यांनाच मतदान करतील असं सांगण्यात आलं, सध्याचं चित्र पाहिल्यास द्रौपदी मुर्मू यांचं पारडं जड दिसत आहे. त्यांना पाठिंबा वाढला आहे. महाराष्ट्रातील आमदार (Maharashtra Assembly Voting Time) आणि खासदारही मतदान करणार आहेत. विधानसभेतले सर्व आमदार यासाठी मतदान करू शकतात. तर सर्व खासदारांनाही यात मतदान करायचं आहे. आज जरी ही मतदान प्रक्रिया पार पडत असली तरी निकालासाठी काही दिवस वाट पाहवी लागणार आहे. 21 जुलैला राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन देशाला नवे राष्ट्रपती मिळणार आहे, त्यामुळे तीन दिवसात नवे राष्ट्रपती कोण? याही प्रश्नाचे उत्तर मिळून जाईल.

Published on: Jul 18, 2022 10:17 AM