पंतप्रधानांनी त्यांचा 2014 ला करिष्मा दाखवला; पदवीवरून अजित पवारांचा टोला
अजित पवार यांनी, 2014 ला त्यांची डिग्री बघून लोकांनी निवडून दिलं का? 2014 ला पंतप्रधान यांनी स्वतःचा करिष्मा निर्माण केला. त्याच श्रेय त्यांना दिलचं पाहिजे.
मुंबई : सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांच्या पदवीवरून वाद रंगलेला आहे. राज्यातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळालेल्या डि-लीट पदवीवरून टीका झालेली आहेत. यावरून राजकारण सुरू झालेले आहे. तर कालच पारपडलेल्या मविआच्या सभेत उद्धव ठाकरे यांनी टीका सुद्धा केली आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पदवीवरून सगळ्यांनाच परखड बोल सुनावलेत. अजित पवार यांनी, 2014 ला त्यांची डिग्री बघून लोकांनी निवडून दिलं का? 2014 ला पंतप्रधान यांनी स्वतःचा करिष्मा निर्माण केला. त्याच श्रेय त्यांना दिलचं पाहिजे. पण आज याच्या डिग्र्या त्याच्या डिग्र्या काढणं हा प्रश्न महत्त्वाचा आहे का? यापेक्षा गॅस सिलिंडर, महागाई, बेरोजगारी त्याबद्दल बोलायचं नाही कुणी चर्चा करायची नाही अशी टीका अजित पवार यांनी केली आहे.
Published on: Apr 03, 2023 02:19 PM
Latest Videos