पुण्यातील बँनरबाजीवर बच्चू कडू भडकलेच; म्हणाले, सगळी मुर्खताच
पुण्यातील पाषाण रोड परिसरात बच्चू कडूंची आमदारकी रद्द करा, अशी मागणी करणारे बॅनर लावण्यात आले आहेत
मुंबई : राज्यासह देशात सध्या सत्ताधारी विरोधात विरोधक आणि विरोधकांच्या विरोधात सत्ताधारी असा संघर्ष पहायला मिळत आहे. मुद्दा मात्र एकच राहुल गांधी. भाजपचे म्हणतात त्यांनी माफी मागावी. तर विरोधक म्हणतात हे सुडाचं राजकारण. याचदरम्यान प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्याविरोधात पुण्यातील पाषाण रोड परिसरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने बॅनरबाजी केली. त्यावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. त्याचबरोबर ही सगळी मुर्खता आहे. हे अज्ञानपणातून लावलेले पोस्टर्स आहेत असं म्हटलं आहे.
पुण्यातील पाषाण रोड परिसरात बच्चू कडूंची आमदारकी रद्द करा, अशी मागणी करणारे बॅनर लावण्यात आले आहेत. यावर, “आमदार बच्चू कडू यांना काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली होती. त्यांची आमदारकी कधी रद्द होणार? नियम हे सर्वांना साखेच असतात.” असं लिहण्यात आलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना कडू यांनी, राहुल गांधी यांचे प्रकरण वेगळे आहे. मला दोन कलमांमध्ये शिक्षा झाली आहे. दोन्ही मिळून केवळ एकाच वर्षाची शिक्षा झाली आहे. त्यामुळे ते मला लागू होत नाही. तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसला काही काम नसल्याचा टोला लगावला आहे.