‘त्यांना’ कोणताही देव पावणार नाही. बजरंग बलीच गदाने मारणार; राऊत यांचा पंतप्रधान, गृहमंत्र्यांवर घणाघात
मैतेई समुदायाला अनुसूचित जातीचा दर्जा देण्याच्या निर्णयावरून हा हिंसाचार उफाळला आहे. असे असनाता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त होते. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत टीका केली आहे.
मुंबई : मणिपूरमध्ये हिंसाचार (Manipur violence) उफाळला आहे. अनेकांचा यात मृत्यू झाला तर 1700 च्या वर घरे जळून खाक झाली आहेत. मैतेई समुदायाला अनुसूचित जातीचा दर्जा देण्याच्या निर्णयावरून हा हिंसाचार उफाळला आहे. असे असनाता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त होते. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) टीका केली आहे. कर्नाटक निवडणुकीवरून पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना लक्ष्य केलं. यावेळी राऊत म्हणाले, पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री शाह यांच्यापासून संपूर्ण मंत्रिमंडळ, देशभरातील राज्याराज्यातील भाजप नेते, राज्यांचे मुख्यमंत्री यांनी कर्नाटकात ठाण मांडलं. कर्नाटक निवडणुकीकरता पैशांचा महापूर आला. अगदी बजरंग बलीला निवडणुकीत उतरवलं. हनुमान चालिसा, वगैरे वगैरे. पण मी तुम्हाला सांगतो, यांना कोणताही देव पावणार नाही. बजरंग बलीच त्यांना गदाने मारणार, असं राऊत म्हणाले.