लोकशाही झुगारणारे नरेंद्र मोंदी यांनी मन की नव्हे तर जन की बात करावी; काँग्रेस नेत्याचा निशाना
या कार्यक्रमावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घणाघात केला आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करताना ते लोकशाही झुगारणारे आहेत.
भंडारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) प्रत्येक महिन्याच्या दर रविवारी जनतेशी ‘मन की बात’ (Man Ki Baat) मधून संवाद साधतात. 2014 मध्ये सत्तेत आल्यापासून ते ‘मन की बात’मधून संवाद साधतात. काल रविवारी 100 वा कार्यक्रम प्रसारित झाला. तर हा कार्यक्रम दणक्यात करण्याकरता भाजपच्या सर्व नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानुसार, देशात 4 लाख ठिकाणी हा कार्यक्रम सार्वजनिक ठिकाणी ऐकण्याकरता नियोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी घणाघात केला आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका करताना ते लोकशाही झुगारणारे आहेत. त्यामुळे त्यांनी मन की नव्हे तर जन की बात करावी. सरकारी तिजोरीतून मोदी मन की बात करतात असा टोला लगावला आहे. मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी सरकारी पैशारी मोठ्या प्रमाणात उधळपट्टी करण्यात येते. तेव्हा लोकशाही झुगारणाऱ्या मोदींनी मन की बात न करता जन की बात करावी. अशी बोचरी टीका नाना पटोले यांनी नरेंद्र मोदी यांच्या मन की बातवर बोचरी टीका केली.