देशाला अशा इव्हेंटची गरज नाही, भाजपला असेल?; ठाकरे गटाच्या नेत्याची टीका!
प्रधानमंत्री यांचे भाषण प्रेरणादायी असलं पाहिजे आणि नक्कीच ते सगळ्यांनी ऐकलं पाहिजे. ज्या पद्धतीने प्रधानमंत्री यांचा भाषणासाठी संपूर्ण देशांमध्ये लोकांना एकत्र केलं गेलं. ज्या लोकांना ऐकायचं आहे. ते ऐकतील ना.
मुंबई : काल (रविवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी 100 वा मन की बात (Man Ki Baat) कार्यक्रम केला. यासाठी भाजपने देशभरात तगडे नियोजन केलं होतं. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी भाजपवर टीका केली आहे. पंतप्रधानांच्या कालचा कार्यक्रम टाळ्या वाजवण्याता इव्हेंट होता, तो भाजपचा होता. देशासाठी नव्हता अशी टोला राऊत यांनी लगावला आहे. प्रधानमंत्री यांचे भाषण प्रेरणादायी असलं पाहिजे आणि नक्कीच ते सगळ्यांनी ऐकलं पाहिजे. ज्या पद्धतीने प्रधानमंत्री यांचा भाषणासाठी संपूर्ण देशांमध्ये लोकांना एकत्र केलं गेलं. ज्या लोकांना ऐकायचं आहे. ते ऐकतील ना. अभिनेत्यांपासून इतर सगळ लोक घेऊन जो इव्हेंट केला. त्याची देशाला गरज होती का?. याची भाजपला गरज होती. म्हणून त्यांनी तो कार्यक्रम केला. हा त्यांच्या प्रश्न आहे, असे राऊत म्हणाले.