दहा, वीस झालं आता तब्बल 75 रूपयाचं नाणं खिशात खळखळणार; पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झालं लोकार्पण

दहा, वीस झालं आता तब्बल 75 रूपयाचं नाणं खिशात खळखळणार; पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झालं लोकार्पण

| Updated on: May 28, 2023 | 2:09 PM

पीएम मोदी यांनी सांगितले की 'हे नवीन भवन नूतन आणि पुरातन अस्तित्वाचं आदर्श आहे. याच दिवशी आरबीआयचं 75 रुपयांचे स्मारक नाण्याचं देखील लोकार्पण करण्यात आलं.

नवी दिल्ली : आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतीय संसदेची नवीन इमारतीचं मोठ्या दिमाखात लोकार्पण करण्यात आलं आहे. यावेळी पीएम मोदी यांनी सांगितले की ‘हे नवीन भवन नूतन आणि पुरातन अस्तित्वाचं आदर्श आहे. याच दिवशी आरबीआयचं 75 रुपयांचे स्मारक नाण्याचं देखील लोकार्पण करण्यात आलं. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे उपस्थित होते. यादरम्यान पंतप्रधानांनी टपाल तिकीटही जारी केलं. पंचाहत्तर रुपयांच्या नाण्यावर संसद परिसर आणि नवीन संसद भवनाची प्रतिमा आहे. हे नाणे 44 मिलीमीटर इतक्या व्यासाचे, नाण्याच्या काठावर 200 रेषा असलेले आणि 50 % चांदी, 40 % तांबे, 5 % निकेल आणि 5 % जस्त ने बनलेले आहे. तर याच्याआधी हे नाणे ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार असेल, असा विश्वासही केंद्रीय अर्थ मंत्रालयाने व्यक्त केला होता.

Published on: May 28, 2023 02:09 PM