रोजगार मेळाव्यावरील विरोधकांच्या टीकेला नारायण राणेंच प्रत्युत्तर; म्हणाले, आता…
बेराजगारी वाढल्या म्हणायला काय? उपाय त्यांच्याकडे आहे का? उपाय आमचं सरकार करतयं. मोदी करत आहेत. नोकऱ्या उपलब्ध करून देणं, गुंतवणूक आणणं, उद्योग लावणं, रोजगार निर्मिती करणं, स्वयंरोजगार निर्माण करणं, असे वेगवेगळ्या उपक्रम ही नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली करत आहोत
मुंबई : देशभरातील 71 हजार तरुणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज रोजगार मेळाव्यातून नियुक्ती पत्र देण्यात. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. त्यांनी, असे नियुक्ती पत्र देण्याचं काम आमचे नगरसेवक आणि शाखाप्रमुख करत असतात असं म्हटलं होतं. त्यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विरोधकांवर निशाना साधला आहे. तसेच विरोधकांना आता बोंब मारण्याशिवाय विरोधकांकडे काही उरलं नाही असा टोला त्यांनी लगावला आहे. बेराजगारी वाढल्या म्हणायला काय? उपाय त्यांच्याकडे आहे का? उपाय आमचं सरकार करतयं. मोदी करत आहेत. नोकऱ्या उपलब्ध करून देणं, गुंतवणूक आणणं, उद्योग लावणं, रोजगार निर्मिती करणं, स्वयंरोजगार निर्माण करणं, असे वेगवेगळ्या उपक्रम ही नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली करत आहोत. त्यामुळे विरोधकांच्या हातात काही नाही राहिलं नाही शिवाय बोंबलायचं, असं नारायण राणे म्हणाले.